रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्था, ऊर्जा धोरण आणि परराष्ट्र संबंधांवर झालेला परिणाम - एक चिकित्सक अभ्यास
Keywords:
रशिया-युक्रेन युद्ध, भारतीय अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा, कच्चे तेल, महागाई, आंतरराष्ट्रीय व्यापार, सामरिक स्वायत्तता, आर्थिक निर्बंध, भारत-रशिया संबंध, परराष्ट्र धोरण.Abstract
रशिया-युक्रेन युद्धाने आंतरराष्ट्रीय राजकारणाबरोबरच जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजारपेठ, व्यापारव्यवस्था आणि विविध देशांच्या परराष्ट्र धोरणांवर दूरगामी परिणाम केले आहेत. विशेषतः ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या विकसनशील देशांसमोर या युद्धामुळे नवीन आर्थिक आणि राजनैतिक आव्हाने निर्माण झाली. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अस्थिरता, अन्नधान्य व खतांच्या पुरवठ्यातील अडथळे, वाढती महागाई आणि रशियावरील आर्थिक निर्बंध यांमुळे भारताला आपल्या आर्थिक आणि ऊर्जा धोरणात आवश्यक बदल करावे लागले. प्रस्तुत संशोधन लेखात रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि परराष्ट्र संबंधांवर झालेल्या परिणामांचा ऐतिहासिक, तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यास करण्यात आला आहे. विशेषतः महागाई, आयात खर्च, रशियन कच्च्या तेलाची वाढलेली खरेदी, द्विपक्षीय व्यापारातील असमतोल, पाश्चात्त्य देशांशी संबंध आणि भारताच्या सामरिक स्वायत्ततेचे चिकित्सक विश्लेषण करण्यात आले आहे.
अभ्यासातून असे स्पष्ट होते की, युद्धाच्या प्रारंभी भारताला जागतिक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा आर्थिक फटका बसला, तथापि, सवलतीच्या दरातील रशियन कच्च्या तेलाच्या उपलब्धतेमुळे भारतीय तेलशुद्धीकरण उद्योगाला काही आर्थिक संधी प्राप्त झाल्या. त्याचवेळी रशियावरील निर्बंध आणि पाश्चात्त्य देशांच्या बदलत्या व्यापारधोरणांमुळे भारताच्या ऊर्जा आयातीसंबंधी नवीन अनिश्चितता निर्माण झाली. परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर भारताने रशियाशी पारंपरिक सहकार्य कायम ठेवताना युक्रेनशी संवाद, अमेरिकेशी भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांशी असलेली बांधिलकी व्यक्त केली. यावरून आर्थिक हितसंबंध, ऊर्जा सुरक्षा आणि सामरिक स्वायत्तता यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट होतो.
References
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022–23, मुंबई, 2023, राज्य अर्थव्यवस्था, पृ. क्र. 9.
पृथ्वी गुप्ता, भारत–रशिया यांच्यातील तेल व्यापार आणि गुंतवणूक, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मराठी संशोधनपर लेख, 20 सप्टेंबर 2023.
गुळगुळे, शशांक, युक्रेन-रशिया युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, मुंबई तरुण भारत, 19 मार्च 2022.
श्रीरामे, डॉ. राजू, आर्थिक विकासाला युद्धाचा धोका, महाराष्ट्र टाइम्स, 25 मार्च 2022.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023–24, मुंबई, 2024.
सरकार, देबोस्मिता आणि भौमिक, सौम्या, जागतिक ऊर्जा बाजार : भारताने समतोल कसा साधला?, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, 2024.
बोम्माकांती, कार्तिक, भारत-रशिया संबंध : धोरणात्मक स्वायत्तता की अपरिहार्यता?, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मराठी विभाग, 9 ऑगस्ट 2024.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य सांख्यिकी गोवारा 2022–23, मुंबई, 2025.
जयप्रकाश, राजोली सिद्धार्थ, निर्बंधांच्या सावटाखाली : रणनीतिक स्वायत्ततेचा नवा आराखडा, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मराठी विभाग, 14 ऑगस्ट 2025.
पंत, हर्ष व्ही. आणि जयप्रकाश, राजोली सिद्धार्थ, तेल, टॅरिफ आणि दोस्ती : भारत-रशिया संबंधांचे नवे समीकरण, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मराठी विभाग, 19 सप्टेंबर 2025.
दै. महाराष्ट्र टाइम्स, (रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकास आणि चलनवाढीचे विश्लेषण, संपादकीय विभाग, मुंबई, 2022.
एबीपी माझा, रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असा होईल परिणाम; जाणून घ्या प्रमुख मुद्दे, मराठी आर्थिक वार्तांकन, 24 फेब्रुवारी 2022.
टीव्ही9 मराठी, युक्रेन संघर्षाचा परिणाम भारतावर, विकासदर आणि महागाईविषयक वार्तांकन, 4 मार्च 2022.
दै. तरुण भारत (रशिया-युक्रेन युद्धाच्या सावटातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत)
Downloads
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2024 International Journal of Engineering Science & Humanities

This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.


