इंटर्नशिपचा बी.एड. प्रशिक्षणार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या आकलनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास
Keywords:
इंटर्नशिप, बी.एड. प्रशिक्षणार्थी, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, शिक्षक शिक्षणAbstract
शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये इंटर्नशिपला विशेष महत्त्व आहे. बी.एड. अभ्यासक्रमातील इंटर्नशिपच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना शाळेतील प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव मिळतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये अध्यापन कौशल्ये, वर्ग व्यवस्थापन क्षमता, शैक्षणिक नियोजन, मूल्यमापन कौशल्ये आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता विकसित होते. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश इंटर्नशिपचा बी.एड. प्रशिक्षणार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या आकलनावर होणारा परिणाम अभ्यासणे हा आहे. प्रस्तुत संशोधनासाठी वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करण्यात आला. संशोधनासाठी संगमनेर येथील दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालयांतील बी.एड. अभ्यासक्रमाच्या 100 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची नमुना म्हणून यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने निवड करण्यात आली होती. माहिती संकलनासाठी प्रश्नावली, मुलाखत व निरीक्षण सूची या साधनांचा वापर करण्यात आला. प्राप्त माहितीचे विश्लेषण शेकडेवारीच्या आधारे करण्यात आले. या संशोधनातून इंटर्नशिपमुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या अध्यापन कौशल्यांमध्ये सकारात्मक बदल झाला. पाठ नियोजन, अध्यापन तंत्रांचा वापर, वर्ग व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेणे आणि आत्मविश्वास वाढविणे यासाठी इंटर्नशिप उपयुक्त ठरल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत.
References
Aggarwal, J. C. (2014). Teacher Education. New Delhi: Shipra Publications.
Best, J. W., & Kahn, J. V. (2006). Research in Education. New Delhi: Prentice Hall of India.
Mangal, S. K. (2012). Advanced Educational Psychology. New Delhi: PHI Learning.
National Council for Teacher Education (NCTE). (2014). Regulations for Teacher Education Programme. New Delhi.
Sharma, R. A. (2011). Teacher Education. Meerut: R. Lall Book Depot.
वाघ, एस. एस. (2018). शैक्षणिक संशोधन पद्धती. पुणे: नित्य नूतन प्रकाशन.
कुलकर्णी, पी. आर. (2016). अध्यापक शिक्षण आणि संशोधन. पुणे: डायमंड पब्लिकेशन.
Downloads
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2021 International Journal of Engineering Science & Humanities

This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.


